मनोरंजन
अभिनेत्री विद्या बालन हिच्या ‘नटखट’ शोर्ट फिल्मचे ऑस्कार अवार्ड्स२०२१ साठी नामांकन
मुंबई: अभिनेत्री विद्या बालन हिच्या नटखट नावाच्या शोर्ट फिल्म चा टीझर हा नुकताच युट्यूब वर आला आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपली शोर्ट फिल्म हि ऑस्कार नॉमिनेशन साठी नामांकित झाल्याचा सोशल मिडिया वर टाकले होते. हि फिल्म बेस्ट शोर्ट फिल्म याविभागा मध्ये नामांकित झाली आहे. शोर्ट फिल्म हि स्त्री पुरुष समानता यावर आधारित आहे
.
विद्या बालन सोबत बाल कलाकार म्हणून सानिका पटेल हिने काम केले आहे. हा विद्या बालन चा निर्माती म्हणून पहिलाच अनुभव आहे.विद्या बालनने याचा टीझर सोशल मिडिया वर टाकला त्यात ती एका ४ ते ५ वर्षाच्या मुलाची आईल होती आणि ती तिच्या मुलाला (सानिका पटेल) हिला स्त्री पुरुष समानतेच धडे देताना दाखवली आहे. नटखट याचे दिग्दर्शन शान व्यास यांनी केले आहे.

