गावाकडच्या बातम्या
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने निरंजन डावखरे यांच्याकडून शिबिरे

गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी येणाऱ्या गरजू व आजारी भाविकांची तपासणी करण्याचा उपक्रमही शनिवारी राबविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी चार ठिकाणी शिबिरे भरविली. त्यात शेकडो भाविकांना औषधेवाटपही करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून देशभरात सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. सध्या ऊन-पावसामुळे शहारतील रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवात गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी गणपतीच्या मंडपात शिबिरे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील नौपाडा येथील हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बाळकूम पाडा नं. 1 येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, इंदिरानगर येथील शिवशक्ती मित्र मंडळ, बाळ मित्र मंडळ येथे शिबिरे झाली. या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराला आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार, भरत चव्हाण, सुनेश जोशी, विलास साठ्ये आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार परिसराची स्वच्छताही करण्यात आली.
————————
फोटोओळी – १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यात शनिवारी चार ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहराध्य़क्ष संदीप लेले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, भरत चव्हाण, सुनेश जोशी, विलास साठ्ये आदी.
२) स्वच्छ भारत अभियानानुसार ठाण्यात सफाई केल्यानंतर भाजपचे पदाधिकारी.



