Health & Fitnessआरोग्य

पुण्यातील तरुणांची ‘पॅड केअर लॅब’

पुणे: महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी सॅनिटरी पॅडचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र, पॅडचा वापर केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे नष्ट कसं करायचं याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नाही. त्यामुळे देशात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या सुमारे १० लाख पॅडच्या विघटनाची समस्या निर्माण झाली आहे. 

त्यामुळे त्या दिवसांच्या काळात महिलांना भेडसावणारी ही समस्या ‘पॅड केअर लॅब’ या पुण्यातील स्टार्टअपने सोडवली आहे.  मेकॅनिकल इंजिनिअर झालेले अजिंक्य धारिया, श्रीनिवास अधे, आसावरी काने आणि जेशा शहा यांनी जुलै २०१८ मध्ये हे स्टार्टअप सुरू केले आहे. पॅडचा वापर केल्यानंतर बऱ्याचदा ते घरातील इतर कचऱ्यासोबत कचरापेटीत टाकले जाते किंवा मोकळ्या जागी व सांडपाण्यात फेकून दिले जाते. त्यातून आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ते ‘पॅडबीन’ आणि ‘पॅटकेअर सिस्टीम’ या यंत्रणांच्या माध्यमातून पॅडची पर्यावरण पूरक नाश करत आहे. वापरलेल्या पॅडची महिला कशा प्रकारे करता येईल याबाबत स्टार्टअपने एक हजार ५०० महिलांचा सर्वे केला होता. त्यातील ९५ टक्के महिलांना योग्य प्रकारे माहिती नसल्याचे पुढे आले आहे. कचऱ्यात टाकून दिलेल्या पॅडचे कचरा वेचक महिला हाताने विलगीकरण करतात. त्यामुळे त्यांना अनेक आजार होतात, अशी माहिती समोर आली आहे.

 ‘पॅडबीन’ आणि ‘पॅटकेअर सिस्टीम’ मध्ये वापरलेले सॅनिटरी पॅड टाकले की त्याचे विनाधूर नष्ट होते. विजेवर चालणारे हे यंत्र काही सेकंदातच पॅडची योग्य प्रकारे विल्हेवाट लावते. तर विघटनानंतर शिल्लक राहिलेल्या वस्तूंपासून सेल्युलोज आणि प्लॅटिक तयार होणार त्याचा वापर इतरत्र केला जाऊ शकतो. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button