LokSabha

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशभरात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांवर कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा निषेध

दिल्ली – आज लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शून्य प्रहर काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देशभरात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध केला. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना थांबवण्यासाठी हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी १६व्या लोकसभेत देखील केंद्र सरकारने या घटना रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, अशी मागणी करत प्रायवेट मेंबर बिल मांडले गेले होते, याची आठवण सभागृहाला करुन दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरांवरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली.

देशभरात आतापर्यंत एक हजारहुन अधिक अशा घटना झाल्या असून ७५% घटनांमध्ये डॉक्टर बळी पडले आहेत. महाराष्ट्रामध्येही आतापर्यंत डॉक्टरांवरील हल्ल्याच्या ५० घटना घडल्या आहेत. यांसारख्या अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नयेत, याकरता सरकारने वैद्यकिय क्षेत्रामधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक ही १.४ टक्के इतकीच आहे. अमेरिका, कॅनडा, फ्रांस, बेल्जियम, जपान, नेदरलँड, स्विडन या राष्टांमध्ये हेच प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे आणि नेपाळ, भुटान, बांगलादेश यां देशांपेक्षाही आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक कमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button