Maharashtra Govविधान परिषद
डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. संख्याबळाच्या जोरावर हे पद काँग्रेसलाच मिळण्याचा दावा काँग्रेसने केला होता मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या जागी विजय वडेट्टीवार यांना दिली व विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी देखील वडेट्टीवार यांचे नाव निश्चित केलं. पण उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधीपक्षनेतेपद देणार नाही, असे युतीनं ठरवले आणि काँग्रेस त्यात अडकून पडली. नाइलाजाने काँग्रेसने उपसभापतीपदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.