पुणे
पुण्यात कम्पाउंडची भिंत कोसळून १६ मजूरांचा मृत्यु
पुण्यातील कोंढवा परिसरात एका इमारतीच्या कम्पाउंडची भिंत कोसळून १६ मजूरांचा मृत्यु झाल्याची घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. घटना स्थळी मातीच्या ढिगाऱ्या खालून ३ जणांना काढण्यात यश आले असून अजूनही एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरु आहे. मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते, अशी माहिती समोर आली. ‘कोंढव्यातील घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे’, असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी माध्यमांना म्हंटले.

