पुणे
पुण्यात इमारतीच्या कम्पाऊंडची भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तींना सरकारकडून ५ लाखाची मदत
पुण्यात इमारतीच्या कम्पाऊंडची भिंत कोसळण्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सदर घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना पंचवीस हजार रुपयांची मदतही जाहीर केली. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले,’बांधकाम मजूर राहत असलेला कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षण भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत मृत पवलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’

