Vidhan Bhavanनागपूर

नागपूर सुतगिरणी कामगारांच्या वेतनप्रश्नी त्वरीत कार्यवाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुतगिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवन येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत नागपूर विणकर सहकारी सुतगिरणीच्या कामगारांच्या थकीत वेतन तसेच हातमाग महामंडळाकडून देय निधीबाबत लवकरात लवकर आणि त्यामध्ये कामगारांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बैठकीस विपणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार सर्वश्री विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव एच. के. गोविंदराज तसेच सुतगिरणी कामगारांचे शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button