क्राईम न्यूजनाशिक
मालेगाव येथील मदरशा मध्ये अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार
मालेगाव : मालेगाव येथील दरेगाव शिवार येथे मुलींच्या मदरशा मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना घडली. खोलीची स्वच्छता करण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलीला बोलवून गुंगीचे औषध देऊन अत्त्याचार केल्याचे पीडित मुलीने पोलीस जबाबात म्हंटले आहे. पीडित मुलगी ही मुंबईच्या मालाड येथील रहिवाशी असून धार्मिक शिक्षणासाठी तिला कुटुंबाने मालेगाव येथील मदरशा मध्ये दाखल केले होते. अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार केली. यादरम्यान मदरशाचे व्यवस्थापक, त्यांची पत्नी, महिला कर्मचारी आणि एका मुलाला पोलिसांनी अटक केली.