चंद्रपूर (Chandrapur)
चंद्रपुरात वाघीणीसह दोन बछड्यांचा मृत्यु
चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ वाघीणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध सुरु आहे. दोन्ही बछडे साधारण आठ ते नऊ महिन्यांचे आहेत. ही माहिती परिसरात पसरताच, गावकऱ्यांनी मृत वाघीण आणि बछड्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. काही ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती तरूण पर्यावरणवादी मंडळाला दिली. त्यांनी वन अधिकाऱ्यांना कळवले. लगेचच वन अधिकारी आणि संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. तेथून थोड्या अंतरावर एक चितळ मृतावस्थेत सापडले. वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे लगेचच सांगता येणार नाही. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असंही त्यांनी सांगितलं.