तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. परिणय फुके
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम आणि एमआरआयडीसी संदर्भात बैठक घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही बाजूचे ॲप्रोच रोड पूर्ण केले. रेल्वे क्रॉसिंगचे काम रेल्वे विभागाची परवानगी घेऊन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने एमआरआयडीसीला महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या रेल्वे क्रॉसिंगची मान्यता देण्याबाबत पाठपुरावा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या www.mahapwd.com या संकेतस्थळावर जाऊन संबधित व्यक्तींनी खड्डा कुठे पडला आहे याबाबतची माहिती अपलोड केल्यानंतर ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते किंवा टोल फ्री नंबरवर फोन करुन सुध्दा खड्डे कुठे पडले आहेत. याबाबतची माहिती कळविली जावू शकते, असे डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले
