अहमदनगर महानगरपालिका

सोशल मीडियाच्या पोस्ट वरून अहमदनगर महापालिकेतील स्वच्छता निरीक्षक निलंबित

पावसाळ्यात एक झाड लावा, वाढवा आणि हिवाळ्यात एक कॉटर मोफत मिळवा, अशा आशयाचा संदेश एका सरकारी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि सध्या ही पोस्ट राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हा खोडसाळपणा संबंधित अधिकाऱ्याच्या अंगलट आला आणि त्याचे निलंबन करण्यात आले आहे. किशोर देशमुख असे त्यांचे नाव असून ते अहमदनगर महापालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कामाला आहेत.

सध्या अहमदनगरमध्ये महापालिका प्रशासनाकडून वृक्ष लागवड चळवळीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी किशोर देशमुख यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर एक संदेश पोस्ट केला होता. मात्र, किशोर देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या संदेशातील कॉटरचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. संस्थेची बदनामी नको, म्हणून माफीही मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button