Maharashtra GovVideoआरोग्यमहानगरपालिकाशहरशिक्षण

अनाथ विशेष मुलांचे पालकत्व सिद्धिविनायक मंदिर घेणार – आदेश बांदेकर

महाराष्ट्रातील अनाथ अशा ‘विशेष मुलांना’ (मतिमंद, गतिमंद, मानसिक विकलांग) सांभाळणे हे आव्हान असून या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्या संस्था काम करतात. अश्या अनाथ मुलांचा साभांळ सक्षमपणे करण्यात अनेक अडथळे येत असल्याचे लक्षात घेऊन दादर येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने आदेश बांदेकर (राज्यमंत्री दर्जा )यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अनाथ विशेष मुलांचे संगोपन विवीघ संस्थांच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मतिमंद, गतिमंद तसेच मानसिक विकलांग अशा अनाथ असलेल्या विशेष मुलांच्या संगोपनाचा सर्व भार उचलण्याचा निर्णय घेतला. याबाबत बांदेकर म्हणाले की, टीव्ही मालिकेतील कार्यक्रमात एका पालकाने विशेष मुलांसाठी सिद्धिविनायक काही करणार का असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नातून राज्यातील विशेष मुलांच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर अनाथ असलेल्या विशेष मुलांच्या संगोपनाचा आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाने एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणारा प्रस्ताव तयार केला आहे. सिद्धिविनायकाच्या चरणी लाखो भाविक श्रद्धेने देणग्या देत असतात.दान सत्कारणी लागावे हीच आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाची इच्छा आहे. अंध, अपंग, विशेष मुले तसेच रुग्णसेवेसाठी आणि ११ वे १५ च्या विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके , वैद्यकीय,शैक्षणिक मिळून वर्षांकाठी २५ ते ३० कोटी रुपये लोकसेवेसाठी सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाकडून दिले जातात, असे बांदेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button