क्राईम न्यूज

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

लष्कर – ए – तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या हाफिज सईदला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार यासारख्या आरोपांखाली एफआयआर दाखल केली होती. त्याचवेळी त्याला अटक होणार अशी चर्चा होती.

पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात ठोस, सत्याच्या कसोटीवर टिकणारी कारवाई करेल त्यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विचार करता येईल. काही काळ आंतरराष्ट्रीय पातळीवर दिशाभूल करण्यासाठी अशी कारवाई करण्याचे सोंग पाकिस्तान करत असते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. हाफिजने फक्त मुंबईवरच नव्हे तर देशाच्या वेगवेगळया भागात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात त्याला अटक झाली होती. पण ती दाखवण्यापुरतीची कारवाई असल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदा पाकिस्तान हाफिज सईदवर कोणत्या प्रकारची कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button