Maharashtra Govकेडीएमसीठाणेठाणे महानगरपालिकाडोंबिवलीवसई - विरार

अंतर्गत जलवाहतुकीच्या पहिला टप्प्याची अंमलबजावणी ऑक्टोबरपर्यंत सुरू करा – केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातंर्गत ठाणे, वसई – विरार, मीरा – भाईंदर, कल्याण – डोंबिवली या शहरांना जोडणा-या अंतर्गत जलवाहतुक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे आदेश केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आंतरदेशीय जलवाहतूक प्राधिकरण तसेच केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना दिले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ८६ कोटींचा निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये असलेल्या खाडीचा व नदी मार्गाचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी उपयोग करण्याच्यादृष्टीने ठाणे महानगरपालिकेने वसई, कल्याण आणि ठाणे यांना जोडणारा क्रमांक ५३ चा जलमार्ग विकसित करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल सादर केला होता.

या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज (बुधवारी) नवी दिल्ली येथे विशेष बैठकीचे केले होते. या बैठकीला केंद्रीय जलवाहतूक सचिव गोपालकृष्ण, मुंबई मेरीटाईम बोर्डचे अध्यक्ष संजय भाटिया, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय सेठी, आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीर पांड्या, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, जलवाहतूक मंत्रालयाचे सह सचिव रजत सचर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातंर्गत वसई – ठाणे – कल्याण या ५३ क्रमांकाच्या जलमार्गाचे सादरीकरण केले तसेच हा जलमार्ग विकसित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणा-या वाहतूक कोंडीतून या परिसरातील नागरिकांची सुटका होणार आहे असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे या प्रकल्पाचा फायदा या क्षेत्रातील सर्वच महापालिकांना होणार असल्याने हा प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या जलमार्गासाठी एकूण ६४५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्यात मीरा – भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जेटी बांधणे, रिव्हर इन्फोर्मेशन सिस्टम विकसित करणे तसेच तीन वर्षे बोटींची दुरूस्ती, निगा व देखभालीच्या खर्चाचा समावेश असून यासाठी अंदाजे ८६ कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button