RPI - रिपब्लिकन पक्षराजकारण
छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
अहमदनगर दि. 30 – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून महायुतीमध्ये येणार असतील तर त्यांच्या सारख्या ओबीसी समाजाच्या वरिष्ठ नेत्याचे स्वागत केले पाहिजे.
छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची असेल आणि शिवसेनेत त्यांचा प्रवेश होत नसेल तर त्यांनी महायुतीचा घटक पक्ष रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले.
आज सायंकाळी अहमदनगर दौऱ्यावर आले असता लोणी येथील ना राधाकृष्ण विखेपाटिल यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ना आठवलेंनी छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर केली.
