गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना विशेष गाड्या सुरू करून दिल्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार राजन विचारे यांचा सत्कार
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना विशेष गाड्या सुरू करून दिल्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार राजन विचारे यांचा सत्कार
प्रतिनिधी- कोकणवासीयांना विशेष गाड्या व विशेष डबे सुरू करून दिल्याबद्दल आज ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार राजन विचारे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले त्यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे संघ संस्थापक श्री. राजु कांबळे या संघटनेचे अध्यक्ष श्री. सुजित लोंढे ;उपाध्यक्ष श्री. सुजित (दादा) नार्वेकर , सचिव श्री. दर्शन कासले ,श्री. परेश गुरव .सल्लागार श्री. महेश धाडवे , महेश आचरेकर ,रविंद्र बद्रीके, यशवंत बावदाणे, तुषार साळवी.खजिनदार श्री. संभाजी तामनकर प्रसन्न पावसकर . संपर्क प्रमुख श्री सुनिल अनंत गुरव . सभासद प्रमुख दत्ता साळवी ,प्रमोद कारिते . तसेच कोकण प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोकणवासीयांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकणकन्या मांडवी एक्सप्रेस यांना अतिरिक्त डब्बे लावण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी पत्राद्वारे कोकण रेल्वे व मध्य रेल्वेकडे केली होती परंतु या गाड्यांना लावण्यात आलेल्या डब्यातील जागा आरक्षित काही महिन्यांपूर्वीच फुल झाल्याने या त्यांना विशेष डब्बे लावू शकत नाही परंतु 1 सप्टेंबर पासून डब्बे या गाड्यांना लावण्यात येईल असे उत्तर रेल्वेकडून प्राप्त झाले आहे तसेच खासदार राजन विचारे यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात येता केलेल्या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने 22 ऑगस्ट पासून तुतारी एक्सप्रेस व दादर रत्नागिरी या गाड्यांना 10 सप्टेंबर पर्यंत ला विशेष डब्बे लावून ट्रेन सुरु केलेली आहे त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाल्याने कोकण प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार राजन विचारे यांचा फलाट क्रमांक पाचवर जाहीर सत्कार करून खासदार राजन विचारे यांचे आभार मानले. तसेच रेल्वे प्रशासनाने दिलेल्या पत्राचे उत्तर देताना गणेशोत्सव दरवर्षी कोकणात विशेष गाड्या धावतात. यावर्षीही गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेवर २१6 (दोनशे सोळा) विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
.


