मुंबई

मुंबईतील ‘हॉटेल फॉर्च्युन’मध्ये आग; २५ डॉक्टर बचावले

  • मेट्रो सिनेमा परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे.
  • मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवानं या आगीत जीवितहानी टळली आहे.

मुंबई : मेट्रो सिनेमा परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवानं या आगीत जीवितहानी टळली आहे. या हॉटेलमध्ये जवळपास 25 डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ हे फॉर्च्युन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. 

मुंबईतील धोबी तलाव परिसरात हॉटेल फॉर्च्युनमध्ये भीषण आग लागली. या हॉटेलमध्ये डॉक्टर वास्तव्यास असल्याने एकच खळबळ उडाली. मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दलाच्यातातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, माहिती मिळताच अग्निशमन  5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीतून 25 डॉक्टरांची सुटका केली असून आग विझवण्यात जवानांना यश आलं आहे. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. आग लागली तेव्हा या परिसरात धुराचे लोट पसरले होते. मात्र आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 फायर गाड्या आणि 4 जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला आणि  शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 

दरम्यान सध्या या सर्व डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button