घरपोच पेपर वितरणाचे गृहनिर्माण सोसायट्याकडून स्वागत
मुंबई : राज्य सरकारने ७ जूनपासून वृत्तपत्रांना घरोघरी वाटण्यास दिली असून, त्याबाबतची अधिसूचनही दारात वितरण करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला औपचारिक अधिसूचनाही निर्गमित केली आहे.
या निर्णयाचे महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनने (महासेवा) स्वागत केले असून या संस्थेने राज्यातील जवळपास ६० हजार सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. “वर्तमानपत्रे सरकार आणि लोक यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. वाचकांसाठी छापील पेपर सोयीस्कर आहे. त्यामुळे त्यांना सविस्तर बातमी वाचता येते. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो आणि ६० हजारांपेक्षा पेक्षा जास्त सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना जारीकेल्या आहेत, अशी माहिती महासेवाचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली.
वृत्तपत्रांना घरोघरी वितरण करण्यास परवानगी देण्याच्या अधिसूचनेसह महाराष्ट्र सरकारने औपचारिक घोषणा केल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी सांगितले की ते याबाबतीत सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरपणे पालनकरू. आम्ही वृत्तपत्र वितरण कर्मचार्यांला ताप वैगेरे आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या थर्मल स्क्रिनिंगसह सॅनिटायझर्स उपलब्ध करून देऊ. लोक आपली वर्तमानपत्रे परत सुरु करण्यास उत्सुक होते, असे चेंबूरमधील एका सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्याने सांगितले.

