Maharashtra Govजळगाव (Jalgaon)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या गाडीचा अपघात, दोघेही सुखरूप

जळगांव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने हे दोन्ही नेते सुखरुप आहेत. जळगावजवळ महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक बसल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जळगावकडे निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जळगाव येथील घरी जात होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने त्यांची गाडी समोरच्या गाडीवर आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही. जळगावमध्ये उद्या या दोन्ही नेत्यांचा दौरा आहे. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन करोना व्हायरसच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button