Maharashtra GovPoliticsShivSena-Congress-NCPमुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पुन्हा दणका; पाच नगरसेवक फोडले

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म न पाळत सिन्नरचे पाच नगरसेवक फोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यांच्या शिवसेनेला पुन्हा दणका दिल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीने पारनेरमध्येही शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते.

शेवटी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली होती. आता पुन्हा राष्ट्रवादीन काँग्रेसने नवीन खेळी खेळत सिन्नरमध्ये उपनगराध्यक्षपद मिळविले आहे. सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गोळेसर यांच्याविरोधात उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बाळासाहेब उगले यांच्यासाठी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले आणि स्वतःच्या १० नगरसेवकांची मतेही बाळासाहेब उगले यांच्या पारड्यात टाकली व त्यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले. बाळासाहेब उगले यांना १५ मते मिळाली तर शिवसेनेच्या उमेदवार प्रणाली गोळेसर यांना १४ मते मिळाली. माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेला धक्का देत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना फोडून बाळासाहेब उगले यांना मतदान करायला लावले. त्यामुळे बहुमतात असलेल्या सिन्नरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. दरम्यान सिन्नर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे.

विशेष म्हणजे सिन्नर नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. फक्त आमदार माणिकराव कोकाटे यांना मानणारे १० अपक्ष नगरसेवक आहेत. सिन्नर नगरपरिषदेत शिवसेनेचे पूर्णपणे बहुमत आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि माणिकराव ठाकरे यांचे राजकीय वैर फार जुने आहे. आता महाराष्ट्रात सत्तेत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आघाडी धर्मात बांधले गेलेले आहेत. मात्र तरीही माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून आपल्या १० नगरसेवकांच्या साहाय्याने सिन्नरचे उपनगराध्यक्षपदी मिळविले आहे.

शेवटी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली होती. आता पुन्हा राष्ट्रवादीन काँग्रेसने नवीन खेळी खेळत सिन्नरमध्ये उपनगराध्यक्षपद मिळविले आहे. सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गोळेसर यांच्याविरोधात उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बाळासाहेब उगले यांच्यासाठी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले आणि स्वतःच्या १० नगरसेवकांची मतेही बाळासाहेब उगले यांच्या पारड्यात टाकली व त्यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले. बाळासाहेब उगले यांना १५ मते मिळाली तर शिवसेनेच्या उमेदवार प्रणाली गोळेसर यांना १४ मते मिळाली. माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेला धक्का देत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना फोडून बाळासाहेब उगले यांना मतदान करायला लावले. त्यामुळे बहुमतात असलेल्या सिन्नरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

दरम्यान सिन्नर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. विशेष म्हणजे सिन्नर नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. फक्त आमदार माणिकराव कोकाटे यांना मानणारे १० अपक्ष नगरसेवक आहेत. सिन्नर नगरपरिषदेत शिवसेनेचे पूर्णपणे बहुमत आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि माणिकराव ठाकरे यांचे राजकीय वैर फार जुने आहे. आता महाराष्ट्रात सत्तेत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आघाडी धर्मात बांधले गेलेले आहेत. मात्र तरीही माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून आपल्या १० नगरसेवकांच्या साहाय्याने सिन्नरचे उपनगराध्यक्षपदी मिळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button