मनोरंजनमुंबईसेलिब्रिटी

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

काल त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह सेटवरील इतर २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आशालता या देखील मुख्य भूमिकेत होत्या. कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण अखेर आज पहाटे ४ वाजता अखेरचा श्वास घेतला.

साताऱ्यातील लोणंद भागात सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरुन एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानतंर सेटवरील जवळपास २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button