मुंबई :- मुंबई मनपाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत ‘भगव्या’वरून वाद सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेससोबत युती केल्याबद्दल, काँग्रेसने केलेल्या ‘कामगिरी’चा उल्लेख करून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोमणा मारला – भगवा तर तुम्ही तुमच्याच हाताने उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील.
मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी शुद्ध भगवा फडकवायचा, असे ठरवले आहे. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली होती.
शेलार यांनी ट्विट केले – १०५ हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत सत्तेत बसलात तेव्हाच ‘भगव्या’चा रंग तुम्हीच फिका केला. भगवा तर तुम्हीच तुमच्या हाताने उतरवलात.
भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच महापालिकेत पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील. गुढीला ‘शुद्ध भगव्याची’ झालर चढवतील. तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना ‘चॅलेंज’ देताय, मुंबईकरच आता करून दाखवतील, असे ते म्हणाले.
105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला.. कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला…ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात…
तेव्हाच "भगव्याचा" रंग तुम्हीच फिका केलात…भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात..
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 20, 2020
भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची..विकासाची गुढी उभारतील..
गुढीला "शुध्द भगव्याची" झालर चढवतील..!
तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा…
मुंबईकरांना चँलेज देताय..
मुंबईकरच आता “करुन दाखवतील”!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 20, 2020
