जाणून घ्या ‘वर्ल्ड केन्सर डे’ विषयी सर्वकाही’
दरवर्षी प्रमाणे ४ फेब्रुवारी हा जगतील कर्करोग दिन हा साजरा केला जातो या दिवशी कर्करोग च्या बाबतीत जागरूकता पसरवली जाते तसेच या बाबतीच्या अफवा यांचे निराकरण केले जाते. कर्करोग हा जगातील दुसर्या क्रमांकावरचा रोग आहे ज्याच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी थीम ही ‘I AM and I Will असा आहे. या वर्षी ही थीम अस दाखवते की आपला आयुष्य, आपल्या भोवतालचे, शेजारचे, आणि शहरातील सर्वांचा आपल्यावर परिणाम होतो. एकात्मता आणि एकीचे बळ यावर अवलंबून आहे .
कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आपण त्या रोगाबाबतीत जाणून घेऊ. कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार असतात.अगदी सांगायला गेले तर १२० प्रकारचे कर्करोग हे आता सध्या अस्तित्वात आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी लक्षणे आणि उपचार असतात. स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग हा जास्त असतो. कर्करोग हा शरीरला कमकुवत करणारे आजार आहे. तो रक्ताच्या पेशी वाढवतो आणि इतर भागांमध्ये पसरू लागतो. वेळेत औषध न केल्यास मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. कर्करोग हा प्रतिकार शक्ती कमी करतो.जगामध्ये दरवर्षी ९ कोटी 3 लाख लोकांचा मृत्यु हा कर्करोगामुळे होतो. पुरुषांना साधारणत: पोट, यकृत, यांचा कर्करोग जास्त होतो.
या रोगाची लक्षणे ही साधारणतः सामान्य आजारापासूनच सुरु होतात. जसे की पोटदुखी, खोकला, गिळताना त्रास होणे, ताप, त्वचेचा रंग बदलने, अचानक वजन कमी होणे इत्यादी. ही लक्षणे अमेरिकेतील नामांकित हॉस्पिटल UCSF तील डॉक्टरांनी सांगितली आहे. कर्करोगाचा उपचार हा तेवढाच महाग असतो. सामान्य लोक हा खर्च करू शकत नाही.त्यामुळे भारत सरकारने वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये ही सुविधा मोफत दिली आहे. तरी आज असंख्य कर्करोग पिडीत रुग्ण हे या सुविधांपासून वंचित आहेत.