Health & Fitnessमुंबई

मुंबई मध्ये वायू प्रदूषणात वाढ ! नवी मुंबई, उपनगर दुषित!

मुंबई: फेब्रुवारी मह्नियात हिवाळ्या सोबतच वायुप्रदूषण सुद्धा वाढले आहे. कोरोनामुळे पहिलेच लोकांच्या मनात भीती आहे त्या बरोबरच वायू प्रदूषणामुळे श्वसनविकारांचा धोका हा वाढला आहे. थंडी आणि हवेची आद्रता यामुळेच वायुप्रदूषण वाढल्याचे समजते. मुंबईमध्ये नवी मुंबई, मुंबई उपनगर हे दुषित शहरांमध्ये येते. मुंबईच्या AIR QUALITY INDEX मध्ये नववर्षाच्या सुरुवातीच्या काळात ही वायू प्रदूषण वाढल्याची नोंद केली आहे. अंधेरी आणि नवी मुंबई अतिशय वाईट दर्जाची हवा असलेल्या शहरांमध्ये येते.

मुंबईतील कमी वायू प्रदूषण असणारी शहरे खालीलप्रमाणे
भांडूप- माध्यम ११४,
वरळी- माध्यम १३२
अंधेरी- वाईट ३११
माझगाव- माध्यम १९७
बोरीवली- माध्यम १९३
नवी मुंबई- अतिशय वाईट ३१३
आणि संपूर्ण मुंबई ची हवा गुणवत्ता ही २३९ आहे.

वायू प्रदूषणामुळे अस्थमा असलेल रुग्ण, श्वसनविकार असलेल, नाजूक त्वचा असणारे यांना त्रास होऊ शकतो जसे की त्वचाविकार, सर्दी, खोकला, डांग्या खोकला, दमा इत्यादी. श्वसनविकार दूर ठेवण्यासाठी आहारात विटामिन -सी युक्त खाद्यपदार्थ खाण्याची गरज आहे.
कोरोनामुळे हात वारंवार धुणे, मास्क घालणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button