Politics

भाजप वर्सेस शिवसेना : नाशिकमध्ये वीजबिलंवरून आंदोलन

नाशिक: वीज बिल न भरल्यास ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल असा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे महावितरणच्या विरोधात भाजपने कठोर भूमिका घ्यायचे ठरवले आहे. नागरिकांसाठी राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे लावण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.

नाशिकमध्ये महावितरणच्या कंपनी समोर आंदोलन करण्यात येणार आहे. हल्लाबोल आणि टाळेठोक अशा त्रीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात वीजबिलांमध्ये सवलत देण्याची ग्वाही हि आघाडी सरकारने केलेली पण याची पूर्तता नाही केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

याविरोधात शिवसेनेने इंधन वाढीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि वाढती किंमत जी आता १०० रुपयापर्यंत पोचली असल्याने शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामोर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मुंबईतील कुर्ला या ठिकाणी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button