मुंबई

अधिकृत कार्यालयातून दिले गेले बनावट आधार कार्ड!

मुंबई: आधार कार्ड हे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून मानले जाते. ज्या गोष्टीने भारतीय नागरिकत्वाची ओळख पटते ते कार्डच जर बनावट मिळत असेल तर काय बोलाल? बोरीवलीत पश्चिमेकडील कनेरा बँकेत आधार कार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीने त्यांचे अधिकृत आधार कार्ड बनविण्याचे कार्यालय चालु केले. व याच सेंटरमधून बनावट आधार कार्ड बनवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केले आहे. या गुन्हेगारांनी नेपाळी नागरिकांचे सुद्धा बनावट आधार कार्ड बनविल्याचे कबुल केले.
 
केनेरा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे केवायसी अपडेटसाठी ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून ते पाठवत असत. नंतर या सेंटर मधील अधिकारी ति कागदपत्र स्कॅन करून फोटो काढून व इतर गोष्टी अपडेट करत असत आणि ग्राहकांना घरपोच पाठवत असत. याच दरम्यान काही कर्मचार्यांनी बोगस आधार कार्ड बनवण्याचे काम चालू केले आणि याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.
 
गुन्हे शाखा युनिट ११ ने प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रयीस शेख यांच्या पथकाने सेन्टरवर छाप टाकला. व गुन्हेगारांना अटक केले. गुन्हेगारांनी हे कबुल केले कि ते दर बनावट आधारकार्ड साठी ४ हजार ते ५ हजार रुपये घेत असत. दोन्ही आरोपींना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button