Politicsराजकारण

आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल : देवेंद्र फडणवीस

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्षाचे नावदेखील राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, फासा आम्हीच पलटणार. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल,” असे विधान फडणवीस यांनी ५ फेब्रुवारीला केले होते.

“भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं फडणवीस म्हणाले,” असं वक्तव्य फडणवीस यांनी ५ फेब्रुवारीला केलं होतं.

पटोले यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. “देशातील सेलिब्रिटींना सरकारच्या बाजूने आता‌ ट्विट करता येते, पण त्यांना जनतेच्या प्रश्नांवर ट्विट करता येत नाही,” असे म्हणत क्रिकेटपटू आणि सिनेतारकांना धारेवर धरलं.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासान दिले नव्हते, असे वक्तव्य करून महाराष्ट्रात खळबळ उडाली. शाहांच्या वक्तव्यावर बोलताना, “भाजप आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झालं, हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?” असा सवाल करत शाहांच्या वक्तव्याची पटोले यांनी खिल्ली उडवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button