आत्मनिर्भर भारताचे नवे पाउल ! ट्वीटर सारखे काढले ‘ Koo’ अँप
नवी दिल्ली : कोरोनाकाळात बर्याच तरुणांच्या नोकर्या गेल्या आहेत. या बेरोजगारी बाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे वक्तव्य केले की या काळात भारताला आत्मनिर्भर बनण्याची वेळ आली आहे. या गोष्टींमुळे लोकांनी प्रेरणा घेऊन बरेच स्टार्ट अप्स काढलेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘वोकॅल फॉर लोकल’ म्हणजेच स्वदेशी गोष्टींना प्राधान्य द्या असेही सांगितले आहे.
देशातील कंपन्या या वेगवेगळ्या पद्धतीने ॲप्लिकेशन वर काम करत आहेत. देशात आत्मनिर्भर भारताची वेगाने प्रयत्न सुरु आहे. भारताने ट्वीटर सारखे Koo अँप काढले आहे आणि या ॲप ची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा चालू आहे. हे मायक्रो ब्लोग्गिंग अँप ट्वीटर चा स्वदेशी पर्याय आहे. बेंगलोर मधील अप्रमेय राधाक्रीष्णाने हे अँप गेल्या वर्षी डेव्हलप केले होते. याचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे हे Digital India AatmaNirbhar Bharat Innovate Challenge चे विजेता ठरले आहे.
या अँपला बर्याच राजकीय हस्तींनी प्रोत्साहन दिले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या बाबतीत ट्वीट करून असे बोलले की, त्यांनी हे अँप जॉईन केले आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकार आणि ट्वीटर यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे ट्वीटर सारखे हे भारतीयांनी बनवलेले अँप लोकांनी वापरले पाहिजे.
Koo ॲप एकदम फ्री आहे. गुगल प्ले आणि ऍपल स्टोर वरून हे अँप तुम्ही घेऊ शकता. हे अँप ट्वीटर सारखेच आहे . यात तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना फोलो करू शकतात. हे अँप इंग्रजीसोबत कन्नड, तमिळ, तेलगु या भाषांचा सुद्धा सपोर्ट करते.