आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी मिनी लिलाव १८ फेब्रवारी रोजी होणार आहे. गेल्यावेळी स्पर्धा करोना व्हायरसमुळे देशाबाहेर झाली होती. पण यावेळी भारतात होणार आहे. एप्रिलपासून होणाऱ्या ही स्पर्धेसाठी आठ संघांनी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेतील विराट कोहली नेतृत्व करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला एक नवा कोच मिळाला आहे.
We are delighted to welcome Sanjay Bangar to the RCB Family as a batting consultant for #IPL2021! 🤩
Welcome aboard, Coach! 🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #NowARoyalChallenger pic.twitter.com/SWKLthSyXl
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 10, 2021
ऑगस्ट 2014 साली संजय बांगर यांची टीम इंडियाच्या बॅटिंग प्रशिक्षकपदी निवड झाली होती. 2019 वर्ल्ड कपपर्यंत बांगर टीम इंडियाचे प्रशिक्षक होते, यानंतर विक्रम राठोड यांना ही जबाबदारी देण्यात आली.वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर बांगर यांना पदावरून हटवण्यात आले. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजीचे कोच भरत अरुण यांना त्यांच्या टीममध्ये सहभागी करून घेतले पण बांगर यांना घेतले नाही.
आयपीएलमध्ये प्रशिक्षक व्हायची बांगर यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी संजय बांगर किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक होते. 2014 साली सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती, पण पंजाबची टीम फायनलमध्ये पोहोचल्यामुळे बांगर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून बढती देण्यात आली.
बांगर यांनी भारतीय संघाकडून २००१ ते २००४ या काळात १२ कसोटी आणि १५ वनडे खेळल्या आहेत. याआधी विराट कोहली सोबत काम करणारे बांगर आता पुन्हा त्याच्या सोबत काम करतील. गेल्यावेळी भारतीय संघासाठी तर यावेळी आयपीएलमध्ये आरसीबीसाठी काम करणार आहेत.
गेल्या काही वर्षापासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. विराटचा संघ अंतिम फेरीत पोहोचला पण विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता या वर्षी विराट आणि आरसीबीला यश मिळेल का याची सर्वांना उत्सुकता आहे.
