पेट्रोलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ
मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल दरात वाढ झाली. पेट्रोल दरात वाढ सुरु असली तरी डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. सलग सतरा दिवसांपासून डिझेलचे दरात वाढ झालेली नाही.
जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 44 डॉलर्सवर स्थिर असून ब्रेंट क्रूडचे दर 46 डॉलर्सवर गेले आहेत.
चीनने अमेरिका तेलाची खरेदी करण्याची योजना आखल्याने क्रूड तेलाच्या किमती वाढल्या आहेत. रविवारपासून पेट्रोल दरात वाढ सुरु आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलचे दर लीटरमागे 17 पैशांनी वाढविले. सोमवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 16 पैशांनी, कोलकाता येथे 13 पैशांनी, मुंबईत 14 पैशांनी तर चेन्नई येथे 12 पैशांनी वाढले होते.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पेट्रोलचे दर 80.90 रुपयांवर गेले आहेत. याच शहरातील डिझेलचे दर 73.56 रुपयांवर गेले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचे लिटरचे दर 87.58 रुपयांवर गेले आहेत तर डिझेलचे दर 80.11 रुपयांवर गेले आहेत.

