पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओला व सुका कचऱयाचे डबे वाटप

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन व स्वच्छता पंधरावड्यानिमित्त ठा.म.पा. प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविका व उथळसर प्रभाग समिती अध्यक्षा नंदा कृष्णा पाटील आणि नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांच्या नगरसेवक निधीतून ओला व सुका कचऱयाचे 500 डबे (DUSTBIN) वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज ब्रम्हाळा तलाव येथे झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेचा वसा पुढे नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या कार्पामातून प्रेरित होऊन कचरामुक्त प्रभाग ठेवण्याकरिता प्रभागातील ब्रम्हाळा तलाव येथे (DUSTBIN) कचऱयाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. संपुर्ण प्रभागातील गृहसंकुलांना ओला कचरा व सुका कचऱयासाठी (DUSTBIN) 500 डब्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच झोपडपट्टीतील काही ठिकाणी सदरचे डबे ठेवण्यात येणार आहे. या कार्पामाला ब्रम्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नाना मारणे, मुर्डेकर, दिपक हजारे, जितेन काबाडी, सुभाष वासू, सिताराम पाटील, सुभाष गुप्ता, सोनाली कोकाटे, नेहा वाघमारे, मिना कदम तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


