लाईफस्टाईल
असे करा वेळेचे नियोजन !
वेळेचे नियोजन म्हणजे या काळातील जणू एक हिस्साच बनला आहे. “अरे यार ! आज किती उशीर झाला! उद्यापासून लवकर करू!” असे उदगार आपल्या तोंडातून हमखास निघतात मग सुरु होतो तोच टाइम टेबल बनवण्याचा अट्टाहास आणि मग नेहमी ठरवल जातं की “हा! उद्यापासून हे असच करायचं!” पण काही केल्या मात्र आपण त्या टाइम टेबल प्रमाणे वागत पण नाही. मग परत तेच आणि हे चक्र कायम चालू राहत. मग करायचं तरी काय ? असा प्रश्न पडतो. या वेळी आपण टाइम टेबल न वापरता काही गोष्टी किंवा सवयी अंगी लावूया जेणेकरून आपण या वेळ ना मिळणे याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू.
१. वेळ घालवणाऱ्या गोष्टींची यादी करा !
तुमच्या ज्या वेळ घालवणाऱ्या गोष्टी, तुम्ही करता त्यांची यादी करा मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती वेळ कशी घालवता. आणि एक एक करून ती गोष्ट आपल्या दिवसातून कश्या काढता येतील हे बघा आणि हे गोष्ट नेहमी मनात आणि विचारात ठेवा जेणेकरून तुम्हाला सवय लागून तुम्ही आपोआप या “टाइम वेस्टर्स” ना तुमच्या आयुष्यातून घालवू शकाल.
२. सोशल मीडियावर नियंत्रण !
सध्याच्या काळात आपल्याला सोशल मीडियाचे एवढे व्यसन लागले आहे की बोटांना टॅप करण्याची जणूकाही सवयच पडली आहे. सोशल मीडिया बघणे वाईट नाही पण त्याचे व्यसन लागणे हे वाईट आहे. सोशल मीडिया चे अँप्स ह्यांना एक वेळ द्या आणि त्याच वेळेत ते बघा बाकीच्या वेळी ते शक्य तितक्या वेळ बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
४. महत्वाची कामे आटपून घ्या
काहीही करण्या आधी महत्वाची कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि ताण येणार नाही. आणि तुमचा दिवस हा सुरळीत जाईल. आणि हे कामे केल्या नंतर कमी महत्वाची कामे करा जेणेकरून ती नंतर केली तरी त्याचा एवढा ताण येणार नाही.
५. एकाच वेळी ३ -४ कामे करू नका
असे केल्याने काय होईल की तुमचे एका कामात लक्ष लागणार नाही. ‘एक ना धड भारंभार चिंध्या’ या उक्तीप्रमाणे होईल. म्हणजेच एकही काम नीट होणार नाही आणि तुमचा त्रागा होईल ते वेगळच. अशा क्लृप्त्या वापरून वेळच राहत नाही असे बोलायला वेळच येणार नाही.