अर्जुन तेंडुलकर हा एक नवखा क्रिकेटपटू असला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच IPL 2021 साठीचा लिलाव पार पडला. त्या लिलावात अर्जुनला मुंबईच्या संघाने २० लाखांच्या मूळ किमतीला विकत घेतले. अनेक मोठे खेळाडूंवर बोली लागली नाही पण अर्जुनला मुंबईने विकत घेतलं. त्यामुळे अर्जुनवर टीका करण्यात आली. केवळ वडिलांच्या नावावर त्याला संधी मिळाली असल्याचे बोलले गेले. पण त्याच्यावरील साऱ्या टीकेला त्याची बहिण सारा हिने सणसणीत उत्तर दिलं.
मुंबईने अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात समावेश केला. त्यानंतर ट्विटरवर नेपोटिझम ट्रेंड होऊ लागला. लोक म्हणू लागले की नेपोटिझममुळे अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. अर्जुनबरोबर त्यांनी सचिन तेंडुलकरवरही खूप टीका केली.
अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टीका करणार्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. साराने भाऊ अर्जुनचे इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. हे करताना तिने लिहिले की, ‘तुमच्याकडून ही कामगिरी कोणी काढून घेऊ शकत नाही, ती तुमची आहे. त्याने दुसर्या स्टोरीत लिहिले, ‘मला तुझा अभिमान आहे’.
मात्र, काही लोकांची नाराजी असूनही अर्जुनचे अनेक चाहते त्यांच्या समर्थनार्थ धाऊन आले आहेत. अर्जुन तेंडुलकर याच्या समर्थनार्थ अनेक चाहत्यांनीही ट्विट केले. बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की अर्जुन स्वत:च्या मेहनतीने मुंबईच्या टीममध्ये सहभागी झाला आहे.
दरम्यान, अर्जुन वडिलांप्रमाणे फलंदाज नसून वेगवान गोलंदाज आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव IPLच्या लिलावात आलं तेव्हा मुंबई इंडियन्स त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांच्या मूळ किंमतीत संघात घेतलं.
