राजकारण

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ‘जन आशीर्वाद दौरा’

येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. म्हणूनच राज्यातील सर्वच पक्षांच्या बैठका आणि नेत्यांच्या दौऱ्यांना वेग आला. अशातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एक राज्यव्यापी दौरा आयोजित करण्याची योजना आखली. या दौऱ्याला ‘जन आशीर्वाद दौरा’ असे नाव देण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद दौऱ्या’चे आयोजन करण्यात येणार असून याबाबत अधिक माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button