Maharashtra Govमुंबईशिक्षण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

कोरोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हास्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय

  • राज्याच्या शहरी भागातील आरोग्यसेवेसाठी सात नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहायक संचालक या पदांचा समावेश.
  • राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
  • वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
  • टाळेबंदीमुळे अतिरिक्त होणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दूध स्वीकारणे आणि रूपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
  • मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आठ महानगरपालिका व सात नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
  • नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषिविज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. या अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button