Maharashtra GovShivSenaपुणेमुंबई
पुण्यावर अजितदादांचे लक्ष, काळजी करू नका ! – उद्धव ठाकरे
मुंबई : पुण्यातील परिस्थितीवर अजितदादा खूप बारकाईने लक्ष ठेवून काम करत आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरोना ही एक राज्यावर आलेली आपत्तीच आहे. भविष्यातील परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण आहे.
या परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वैद्यकीय यंत्रणेशी समन्वय राखणे गरजेचे आहे; मात्र कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन व आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



