BJPपुणे

भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांचा हल्ला

पुणे : दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी धक्काबुक्कीत जखमी झाल्या आहेत. यामध्ये त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली आहे. शनिवारी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ काही जण दारू पिण्यासाठी बसले होते. विलास आणि राहुल कोल्हे यांनी त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दारुड्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मेधा कुलकर्णी घटनास्थळापासून जवळच राहतात असल्याने काय झालं याची चौकशी करण्यासाठी त्या तिथं आल्या. सोसायटीतील इतर लोक जमले. तेव्हा या चौघांनी सर्वांना धक्काबुक्की करीत हाताने मारहाण करून तुमचा मुडदा पाडण्याची व बघून घेण्याची धमकी दिली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी अमर बनसोडे, विनोद गंदे, तेजस कांबळे आणि आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button