Satara

ईव्हीएम घोट्याळ्यावरून उदयनराजे देणार खासदारकीचा राजीनामा?

सातारा – उदयनराजेंने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप पराभुत उमेदवारांनी केला. त्यावर उदयनराजेंनी आक्षेप करत आपण राजीनामा देत असल्याची माहिती फेसबुकद्व्यारे सर्वांना दिली. पराभूत उमेदवारांनी अनेकदा ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उचलला. पण विजयी उमेदवाराने ईव्हीएमवर आक्षेप घ्यायची ही पहिलीच वेळ आहे. आता या वादात उदयनराजेंनी उडी घेतली असून निवडणूक आयोगावर सणसणीत टीका करणारी फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली. ‘ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या; मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या,’ असं उदयनराजेंनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button