मुंबईत रोगाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी बीएमसीचा मॅकेंसीसोबत अभ्यास
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेमार्फत अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र काही विभागांमध्ये विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे.
यापैकी जी उत्तर विभागात धारावी, माहीम, दादर परिसरात सर्वाधिक ३७० बाधित क्षेत्र आहेत . या पार्श्वभूमीवर मुंबईत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीएमसी आता ग्लोबल कंसल्टेंसी फर्म मॅकेंसीसोबत अभ्यास करणार आहे . या अंतर्गत एक टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे . जी मुबईतील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करणार आहे .
मंगळवारी, भारतीय वैद्यकीय परिषदेने जाहीर केले की, आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, राज्य आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आणि भारतातील एसएआरएस-सीओव्ही -2 संसर्गाचे प्रमाण किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी तो समुदाय आधारित सीरो-सर्वेक्षण करीत आहे. काही प्रकरणाच्या आधारे वर्गीकृत जिल्ह्याच्या चार क्षेत्रात 24 हजार प्रौढांना कवर करणार आहेत . महाराष्ट्रात सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे .
ज्यात बीड, नांदेड़, परभणी, जळगाव , अहमदनगर आणि सांगली यांचा समावेश आहे .रोगाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या पद्धतीचा तपशील विचारला असता मॅकेंसीतर्फे कोणतीच माहिती देण्यात आली नाही . आम्ही कोणतीच माहिती देऊ शकत नाही त्यासंदर्भात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे त्याच्याकडून सांगण्यात आले .

