Health & Fitnessमुंबई

महानायक अमिताभ बच्चन कोरोनाच्या कवेत

अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चनलाही कोरोना

मुंबई : महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्विटकरत ही माहिती दिली आहे. त्यांना नानावटी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.

मला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भर्ती झालेलो आहे. घरातील सर्व सदस्य आणि कर्मचाऱ्यांची देखील टेस्ट करण्यात येत आहे, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.गेल्या दहा दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करून घ्याव्यात असेही आवाहन अमिताभ बच्चन यांनी आवाहन ट्विटर द्वारे केले आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने कुटुंबीयांची तातडीने तपासणी करण्यात आली.

त्यात चिरंजीव अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिषेक बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आज माझे वडील व मी दोघांचीही कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव आढळली. लक्षणे कमी असणार्‍या आमच्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही सर्व आवश्यक ती माहिती यंत्रणेला दिली आहे. आमचे कुटुंब आणि कर्मचारी या सर्वांची चाचणी घेतल्या जात आहे. घाबरू नका.

या दोघांनीही त्यांची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. दरम्यान ऐश्वर्या राय बच्चन ,आराध्य बच्चन आणि जया बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवालही समोर आला आहे. हा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button