FeaturedFoodHealth & FitnessHealth & Fitnessफूडलाइफस्टाइललाईफस्टाईल

हे दुधात टाकून झोपण्यापूर्वी प्यायलात तर शरीराला होतो फायदा !

दुधाचे फायदे हे खूप असतात त्याने कॅल्शियम मिळते. दुधात साखर टाकून पिण्याचा सुद्धा खूप जणांचा हट्ट असतो. साधं दूध तर आपण बहुतांश वेळा पितो. पण दुधात बडीशेप घातल्याने या दुधाचे फायदे हे दुप्पटीने वाढतात. बडी शेप ही सुगंधित असल्याने तिचा माऊथ फ्रेशनर म्हणून उपयोग केला जातो. अनेक पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केल्या जाणा-या वापरासोबतच औषध म्हणून देखील बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप मध्ये आढणारे फायबर व पोषक तत्व पोटासाठी खूप लाभदायक व चांगले मानले जातात.

बडी शेपाचे जसे स्व:ताचे उपयोग असतात तशीच ती दुधात घाल्याने तिचे फायदेही वाढतात. दूध व बडीशेप अशा दोन्ही तत्वांमधील आरोग्यवर्धक फायदे शरीराला मिळतात. बडीशेप घातलेले दूध बनवणे अत्यंत सोपे आहे. एक ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घालून ते दूध चांगले उकळवून घ्या. नंतर हे दूध प्या.

मसालेदार व तेलकट खाद्यपदार्थांमुळे होणारी अ‍ॅसिडीटी व सूज कमी करण्यास देखील बडीशेप मोलाची मदत करते. तसंच बडीशेपमधील फायबर व मॅग्नेशियम हे घटक शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि एनीमियाशी लढा देण्यासही लाभदायक ठरतात.

बडीशेप मध्ये असणा-या तेलामुळे अपचन, सूज व बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे पोटाशी निगडीत सर्व आजार दूर करण्यासाठी बडीशेपचे दूध लाभदायक मानले जाते. बडीशेप मध्ये असलेल्या एस्ट्रैगल और एनेथोल या गुणधर्मांमुळे पोटाचे आजार जसं की मुरडा पडणे, वेदना, गॅस्ट्रक पेन यावर हे दूध प्रभावी औषध मानले जाते.

मुरुमे व अस्थमा दूर करण्यासाठी तसेच त्वचेला तजेला आणण्यासाठी, पचन सुधरवण्यासाठी हे बडीशेप मिश्रित दुध उपयुक्त असते. हृदयरोग तसेच लठ्ठपणा, कॅन्सर, कोलेस्ट्रोल या गोष्टीना कमी करण्यासाठी सुद्धा हे दुध कामाला येते. याचे नियमित सेवन शरीराला नक्कीच आरोग्यकारक असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button