Sportsक्रिकेटक्रीडा

सुपर अश्विन… डेल स्टेन, ग्लेन मॅकग्राला टाकलं मागे

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 178 धावांत बाद झाला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्याने 17.3 षटके टाकली आणि त्यात 6 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या फिरकीपटूने गडी बाद करण्याचा पराक्रम अश्विनने तब्बल 114 वर्षांनी केला. त्याचसोबत अश्विनने आणखी विक्रमदेखील केला.

चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावात उभारलेल्या 578 धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात 337 धावांपर्यंत मजल मारता आली. सुंदर, पंत आणि पुजारा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं सन्माजनक धावसंख्या उभारली. पहिल्या डावात 241 धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांवर आटोपला पण पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताला एकूण 420 धावांचे आव्हान मिळाले.

कसोटी क्रिकेटमध्ये 144 वर्षात आतापर्यंत 2400 च्या वर सामने झाले आहेत आणि त्यात 8750 डाव खेळले गेले आहेत. त्यात 71 हजार 800 च्यावर विकेट निघाल्या आहेत. 1804 गोलंदाजांनी किमान एक तरी विकेट काढली आहे पण या 1804 गोलंदाजांत रविचंद्रन अश्विन हा एकटाच वेगळा आहे. तो यासाठी की कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वात पहिल्या चेंडूवर आणि डावातील अखेरच्या चेंडूवर विकेट काढणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. याप्रकारे त्याने ही ‘फर्स्ट टू लास्ट’  अशी एकमेवाद्वितीय कामगिरी केली आहे.

ज्यांनी आठशे- सातशे विकेट काढल्या आहेत आणि ज्यांनी किमान एक तरी विकेट काढली आहे अशा कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी जमलेली नाही.

आता हे सर्वांना माहितच झालेय की, इंग्लंडविरुध्दच्या चेन्नई कसोटीत अश्विनने सोमवारी डावाच्या सर्वात पहिल्या चेंडूवर रोरी बर्नस् याला बाद केले होते आणि इंग्लंडचा हा डाव त्यानेच जेम्स अँडरसनला बाद करुन 178 धावांवर संपवला होता. याप्रकारे डावातील पहिली आणि शेवटची विकेट अश्विननेच काढली पण त्यात विशेष हे की डावातील सर्वात पहिल्या आणि अगदी शेवटच्या चेंडूवर विकेट त्याच्या नावावर लागली.

कसोटी डावातील सर्वात पहिल्या चेंडूवर गडी बाद करणारा तो केवळ तिसराच आणि गेल्या 114 वर्षातील पहिलाच फिरकीपटू ठरलाच होता पण अँडरसनच्या विकेटने त्याला एकदम स्पेशल, एकदम वेगळा गोलंदाज ठरवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button