शिक्षण
मुंबई विद्यापीठाचे ‘स्कुल ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड अप्लाईड सायन्सेस’ चे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न
मुंबई विद्यापीठाचे ‘स्कुल ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड अप्लाईड सायन्सेस’ चे उदघाटन आज कल्याणमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुभाष भोईर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती.

या स्कुल ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड अप्लाईड सायन्सेसमध्ये एम. टेक कम्प्युटर इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस आणि एमएस्सी इन ओशिनोग्राफी असे क्षेत्रातील रोजगाराक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.