Health & Fitness

होम क्वारंटाइन होण्यासाठी हातावर शिक्का मारला जातो, त्याच्या केमिकलकडे लक्ष द्या!

कोरोनाच्या साठीमुळे बंद असलेली विमानसेवा सुरू झाली मात्र सुरक्षा म्हणून विमानातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातांवर ‘क्वारंटाइन’चा शिक्का मारला जातो. या शिकण्यासाठी वापरण्यात येणारी शाई उबजते अशी तक्रार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी खासदार मधू गौड याक्षी यांनी रविवारी ट्वीट करून त्यांच्या हातावर शिक्का मारल्यामुळे कसा परिणाम झाला याचा फोटो शेअर केला आहे. मधु याक्षी यांच्या हातावर मारण्यात आलेल्या शिक्याची शाई उबजली (रिअ‍ॅक्शन झाले) आहे.

मधु याक्षी यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना ट्वीटरवर टॅग करून तक्रार केली. ‘प्रिय हरदीप सिंह पुरी जी, परदेशातून भारतात आल्यावर विमानतळावर होम क्वारंटाइन होण्यासाठी हातावर शिक्का मारला जातो आहे. त्याच्या केमिकलकडे लक्ष द्या, माझ्या हातावर दिल्ली विमानतळावर शिक्का मारला होता. हातावर त्याचे ‘रिअॅक्शन’ झाले आहे.

मधु यांच्या तक्रारीची दखल घेऊन हरदीप सिंह पुरी यांनी सुद्धा ट्वीटरवरच उत्तर दिले – आपण ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल आपला आभारी आहे. याबद्दल विमानतळ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सीएमडीसोबत चर्चा करणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्यांना ‘होम क्वारंटाइन’ होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाउन’चा शिक्का मारला जातो. देशात विमान सेवा सुरू झाली आहे. प्रत्येक विमानतळावर येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो आहे. प्रवासी क्वारंटाइनच्या अवधीच्या आधी ते घरातून बाहेर पडले तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात येईल.

याआधीही राज्यात मार्च महिन्यात लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी हातावर शिक्के मारण्यात आले होते. तेव्हाही ‘रिअॅक्शन’ची तक्रार आली होती. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही याचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शिक्के मारणे बंद झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button