Policeक्राईम न्यूजमुंबई

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचे शव आढळले !

आत्महत्या की घातपात?

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे.  मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.

हकीगत अशी की, गाडीची ओळख पटू नये म्हणून अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या त्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून मिटवण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून गाडीची ओळख पटली. ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती चौकशीत उघड झाले. गाडीच्या चोरीची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. चौकशीत गाडी ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची असल्याचे आढळले.

ती स्कॉर्पिओ जुनी होती. त्या जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. त्या काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती.

लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. ऑपेरा हाउस येथे काम असल्याने १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारी ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाले. तिथे सर्विस रोडवर गाडी पार्क करून मनसुख निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी ते गाडी नेण्यासाठी ऐरोली ब्रिज परिसरात गेले तेव्हा गाडी तिथे नव्हती. मनसुख यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात गाडी चोरी गेल्याची तक्रार दिली.

गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. पण पोलीसांसमोर ते हजर झाले त्यावेळेस ते काय म्हणाले होते ते नक्की ऐका. त्यांचा हा जवळपास तीन मिनिटांचा व्हिडीओ आता ह्या प्रकरणात महत्वाचा ठरणार आहे. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button