Health & FitnessMaharashtra Govमुंबई

बहुसंख्य विलगीकरण केंद्र रिकामे असतांना सरकारची नव्यांसाठी घाई कशासाठी ?

मुंबई : गोरेगाव येथे १२४० खाटांपैकी फक्त ५० खाटांवर रुग्ण आहेत. १०८० रिकाम्या आहेत. याशिवाय सरकार एक हजार खाटांचे नवे केंद्र उभारते आहे.

शहरात जे मोठे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत ते डॉक्टर आणि नर्सेस उपलब्ध नसल्याने रिकामे आहेत. या सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार वेगाने व्यवस्था करते आहे. सध्या विगोकर्ण केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या तीन हजार खाटांपैकी फक्त ५० वर रुग्ण आहेत. हे केंद्र आहे गोरेगाव येथील नेस्को (NESCO) हे आहे. बांद्रा – कुर्ला येथील १०८० खाटांची व्यवस्था आहे पण एकही रुग्ण नाही. महालक्ष्मी रेसकोर्स येथेही ३५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे पण हे केंद्र अजून सुरूच झाले नाही.

याशिवाय सरकार एक हजार खाटांची व्यवस्था असलेली दोन केंद्र – रिचर्डसन आणि मुलुंडमधील क्रुडास प्लॉट,येथे उभारण्यासाठी काम करते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button