Indian RailwayMaharashtra GovRailwaysमुंबई

अनधिकृत रेल्वे तिकीट काढून देणाऱ्या दलालांवर कारवाई !

मुंबई: मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची अनधिकृत तिकिटे काढून देणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामध्ये २०२० मध्ये ४६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच ४९२ दलालांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पावणे तीन कोटी रुपये किमतीची १४ हजार ३४३ तिकिटे हस्तगत करण्यात आली आहे. अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

रेल्वेच्या ई- तिकिटे काढण्यासाठी एक आयडी असतो. त्यावरून त्यांना ठराविक तिकिटे काढण्याचा अधिकार असतो पण काही दलालांनी आपली वैयक्तिक आयडी दाखवून ई तिकिटांचा काळाबाजार करण्याचा विचार केला आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवल्या. हे प्रकरण समजल्यानंतर मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने अशा तिकीट दलालांविरोधात मोहीम काढली. आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेही टाकले.

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ या विभागात वर्षभरात केलेल्या कारवाईत ४६६ गुन्हे दाखल झाले. एकूण १४,३४३ तिकिटे जप्त करण्यात आली असून त्यात १४ हजार ई तिकिटे आणि २७८ तिकीट खिडक्यांवरील तिकिटांचा समावेश आहे. मुंबई विभागामध्ये एकूण २५३ गुन्हे झाले आहेत. एका विशिष्ठ सॉफ्टवेअर चा वापर करून अनधिकृत तिकिटे दलाल काढत असत. या सॉफ्टवेअर मुळे तिकिटे अधिक झटपट काढली जातात. यामुळे अनधिकृत तिकिटांचा काऴा बाजार करणे त्यांना शक्य झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button