क्रिकेटक्रीडा

रोहित आणि बुमराह यांची आयसीसीच्या ड्रीम टीममध्ये एन्ट्री

आयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची रविवारी सांगता झाली. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आयसीसीने आपली ड्रीम टीम जाहीर केली असून सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगतीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या संघाचे नेतृत्व न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे देण्यात आले आहे.

स्पर्धेत केलेली कामगिरी व इतर निकषांच्या आधारे आयसीसीने आपला संघ ट्विटरवर जाहीर केला.

Your #CWC19 Team of the Tournament!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. अष्टपैलू कामगिरीने लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनला या संघात स्थान मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button