शिक्षण

१४ हजार शिक्षकांची वेतनासाठी प्रतीक्षा !

पालघर: पालघर जिह्यातील १४ हजार शिक्षकांना अजून मागील महिन्याचे वेतन हे मिळालेले नाही. गावागावात जाऊन ज्ञानार्जन करणारे हे शिक्षक अजूनही वेतनापासून वंचित आहेत. वेतनाची तारीख उलटून २२ दिवसही झाले तरीही त्यांना वेतन मिळालेले नाही. कोरोनामुळे पहिलेच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यातून वेतन हे उशिरा मिळणे हा दुष्काळातील १३ महिना आहे असे बोलण्यास हरकत नाही.

महिन्याच्या १ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळते आणि १ तारखेला वेतन देणे हा निर्णय शासनाने दिला आहे. पण पालघर जिह्यातील प्राथमिक शिक्षकांना १ तारखेला वेतन मिळताच नाही. यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांना कोरोनाकाळात आगाऊ रक्कम मिळाल्याने डिसेंबर मध्ये त्यांच्याकडून वेतनातून कपात करण्यात आली. मागच्या महिन्यात बरोबर १ तारखेला वेतन मिळाले होते पण या वेळेस मात्र २२ तारीख उलटून गेली तरीही वेतन मिळालेले नाही.

चूक कोणाची हे पाहता, कार्यालयीन वेतन देणारे अधिकारी हे उशिर करत असल्याचे समजते आणि दर वेळेस ही हमी दिली जाते की वेतन वेळेवर होईल. पण कधीही वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होते.

शिक्षकांचे एक तारखेला वेतन देण्याचा नियम आहे. केवळ कार्यालयाच्या चुकीच्या नियोजनामुळे शिक्षकांना उशिरा वेतन मिळते. दरवेळेस वेळेवर वेतन देऊ असे सांगितले जाते. पण वेळेवर कधीच वेतन मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना विनाकारण आर्थिक अडचणींचा त्रास सहन करावा लागतो, असे आदिवासी शिक्षक संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार लिलका यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button